MPSC अभ्यास इतिहासाचा
![]() |
MPSC च्या इतिहास हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. MPSC पुर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा( PRELIMS AND MAIN). या दोन्ही परीक्षेत इतिहासावर प्रश्न नक्की विचारले जातात. मागील काबी वर्षांच्या परीक्षेंचा अभ्यास केला असता अस लक्षात येत की इतिहास हा विषय MPSC परीक्षेचा GAME CHANGER ठरतो. म्हणुनच MPSC EXAM चा अभ्यास करताना इतिहास या विषयाचा सखोल अभ्यास करणे अतंत्य आवश्यक आहे.
इतिहासाचे कालखंड
इतिहास या विषयाचा अभ्यास करताना प्रामुख्याने तीन कालखंडाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे तीन कालखंड पुढीलप्रमाणे आहेत.
१)प्राचीन भारताचा इतिहास- मोघलांच्या आधीचा काळ
२)मध्ययुगीन भारताचा इतिहास- बाबर ते औरंगजेब यांचा काळ(मुखलांचा इतिहास)
३) आधुनिक भारताचा इतिहास - इंग्रजांचे भारतात आगमन ते स्वातंत्र्य
आधुनिक भारताचा इतिहास
भारतीय इतिहासचे हे तीन कालखंड MPSC EXAMसाठी महत्वाचे आहे. पण मागच्या काही वर्षात आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला असता असं आढळुन येत की प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहासावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यात महाराष्ट्राच आधुनिक भारताचा इतिहासातील योगदान यावर आयोगाने जास्त भर दिला आहे.
तर आता आपण आधुनिक भारताचा इतिहासातील काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.
१)ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना आणि १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना.
भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या
किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या. यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. सुरवातीस फ्रेंचांच वर्चस्व होतं पण कालांतराने ब्रिटिशांची सत्ता भारतात घट्ट झाली.
२)१८५७ चा स्वातंत्र्यलढा
इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. त्यामध्ये बदल झाला, तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. यातुनच १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यास सुरवात झाली.
३)धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व
भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी समाजप्रबोधन केले.
४)भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे यासाठी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.
५)असहकार चळवळ
गांधीजींनी असहकार चळवळीच्या माध्यमातुन एक देशव्यापी आंदोलन केले.
६)सविनय कायदेभंग चळवळ
सविनय कायदेभंग हा देखील गांधीजींच एक स्वातंत्र्यसाठी केलेले आंदोलन होते.
FOR DOWNLOAD COMPLETE INFORMATION ABOUT ABOVE POINTS DOWNLOAD THE PDF
FOR DOWNLOAD CLICK ON THE TITLE

ConversionConversion EmoticonEmoticon